निपाणी (वार्ता) : राज्य शासनातर्फे रविवारी (ता.२ ऑगस्टला) पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणीला भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. शहरात तीन केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोल्हापूर वेसवरील केएलई महाविद्यालय, शिंत्रे कॉलनीतील व्हीएसएम जी. आ. बागेवाडी महाविद्यालय आणि जत्राट …
Read More »निपाणी मतदारसंघातील एसआयआर कामकाज समाधानकारक असल्याची सुप्रिया पाटील यांची माहिती
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील यादीची सखोल फेरतपासणी म्हणून एसआयआरचे कामकाज सुरू होते. शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वीच हे काम अंतिम टप्प्यात आल्याची बाब समाधानकारक असल्याची माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी दिली. पुढील काळातील निवडणुकीच्या दृष्टीने एस आय आर चे कार्य महत्वपूर्ण आहे. शहर आणि ग्रामीण भागात …
Read More »राष्ट्रीय महामार्गावरील खरी कॉर्नर वरील पुलाची भिंत किरकोळ पावसातच कोसळली
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापर्यंत सुरू आहे. महामार्गामुळे महात्मा गांधी हॉस्पिटल, हरी कॉर्नर, यरनाळ, शिरगुप्पी परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांच्या सोयीसाठी खरी कॉर्नर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. पण त्यातील काही भाग पहिल्या किरकोळ पावसातच ढासळला आहे. त्यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे …
Read More »विश्वकर्मा समाजाच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे योगदान
खानापूर : श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्ट, खानापूर यांच्या मंदिराच्या जागेसंदर्भातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, संबंधित पीटीसी (PTC) नकाशा ट्रस्टच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ट्रस्ट पदाधिकारी, सभासद आणि समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले की, …
Read More »स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये कारगील विजय दिन
निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल, पी.जी. विद्यामंदिर आणि कोल्हापूर येथील सह्याद्री ट्रेनिंग फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिन कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कारगील युद्धातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेतर्फे सह्याद्री ट्रेनिंग फोर्सच्या पदाधिकाऱ्यांचा …
Read More »महात्मा बसेश्वर सौहार्द संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती, आषाढी एकादशी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती आणि आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर स्वामी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विठोबा-रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्ष किशोर बाली …
Read More »कर्नाटकात युवकांमधील एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे
बेंगळुरू : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार देशातील एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटकाचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात विशेषतः युवकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांची एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »निपाणी परिसरात दमदार पावसामुळे सोयाबीनसह ऊस पिकाला बूस्टर डोस
निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली होती. पाऊस वेळेत न झाल्याने खरीप हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दोन दिवसापासून झालेल्या पावसाने सोयाबीन, ऊसासह भाजीपाला पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कोमेजलेली पिके आता बहरत आहेत. यावर्षी …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक असलेल्यांनी एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग दाखवा; खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने आवाहन
खानापूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. आवाहनात म्हटले आहे की, इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया …
Read More »बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मिरची पीक धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत
निपाणी (वार्ता) : उशिरा आलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपमुळे मिरची पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हिरवेगार दिसणारे मिरची पीक पिवळे पडत असून हंगाम धोक्यात आला आहे. पिकांवरील हा बुरशीजन्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.परिणामी या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta