


खानापूर : श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्ट, खानापूर यांच्या मंदिराच्या जागेसंदर्भातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, संबंधित पीटीसी (PTC) नकाशा ट्रस्टच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ट्रस्ट पदाधिकारी, सभासद आणि समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले की, खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पाठपुराव्यामुळे हे दीर्घकाळ रखडलेले काम अल्पावधीत पूर्णत्वास गेले. या प्रक्रियेत ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद आणि हितचिंतक यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशाबद्दल ट्रस्टच्या वतीने डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे आभार मानण्यात आले असून, सर्व पदाधिकारी, सभासद आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यापुढेही समाजहिताची कामे आणि मंदिराच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी समाजातील विविध घटकांनी, सामाजिक कार्य, शेतकरी, गरजू नागरिक तसेच माता-भगिनींच्या प्रश्नांसाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर भविष्यातही ठामपणे पाठिशी उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta