


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती आणि आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर स्वामी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विठोबा-रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
अध्यक्ष किशोर बाली यांनी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून स्वातंत्र्याबद्दल बीज पेरले. टिळक हे भारतीय स्वातंत्र चळवळीतील मजबूत जहालवादी नेते होते. टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र चालू केले. ब्रिटिशाधिकारी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणत होते. त्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी त्यांना बहाल करण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमास संचालक डॉ. एस. आर. पाटील, प्रताप पट्टनशेट्टी, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस.के. अदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, सुरज घोडके, विद्या कमते, महादेव बडीगेर, चंद्रकांत हणबर व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta