Sunday , September 20 2026
Breaking News

स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये कारगील विजय दिन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल, पी.जी. विद्यामंदिर आणि कोल्हापूर येथील सह्याद्री ट्रेनिंग फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिन कार्यक्रम पार पडला.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कारगील युद्धातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेतर्फे सह्याद्री ट्रेनिंग फोर्सच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. संचालक महावीर पाटील यांनी कारगील विजय दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय जवानांच्या शौर्याचा गौरव केला. मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ यांनी मार्गदर्शन करताना देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे कार्य अधोरेखित केले. जे. एस. पाटील यांनी कारगील युद्धाचा इतिहास, त्यामागील कारणे व भारताने मिळविलेल्या विजयाचे महत्त्व स्पष्ट केले. वैष्णवी यांनी सैनिकांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. बी. एस. स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. जे. बी. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *