Tuesday , July 28 2026
Breaking News

बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता विक्री प्रकरण; आरोपीला अटक

Spread the love

 

उपनिबंधक कार्यालयातील गैरव्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी

बेळगाव : बेळगाव येथील उपनिबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःलाच मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवत दुसऱ्याची मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी पिरणवाडी येथील लक्ष्मण देसाई (वय ६२) याला पोलिसांनी अटक केली आहे.

२०२५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात आरोपीने बनावट ओळखपत्रे व कागदपत्रांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादीची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ आरोपीवर कारवाई करून न थांबता, उपनिबंधक कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा या गैरव्यवहाराला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिजगर्णी हायस्कूलच्या मैदानावर झोनल‌ माध्यमिक शालेय स्पर्धांचे आयोजन

Spread the love        बिजगर्णी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *