Sunday , September 20 2026
Breaking News

अथणीतील वेंकटेश्वर लॉजवर पोलिसांची धाड; देहविक्री प्रकरणी दोघांना अटक, महिलांची सुटका

Spread the love

 

बेळगाव : अथणी शहरातील गांधी मार्केट परिसरातील वेंकटेश्वर लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून काही महिलांची सुटका केली असून, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेंकटेश्वर लॉजमध्ये देहविक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात लॉज व्यवस्थापक रुद्रप्पा नावलगी आणि श्रीनाथ वाघमोरे यांना अटक करण्यात आली आहे.

तपासात आरोपी लॉजमध्ये महिलांना आणून त्यांचा देहविक्रीसाठी वापर करत असल्याचे समोर आले आहे. छाप्यादरम्यान महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना आवश्यक संरक्षण देण्यात आले आहे.

या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *