Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत पोलीस भरती परीक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पाहणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राज्य शासनातर्फे रविवारी (ता.२ ऑगस्टला) पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणीला भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. शहरात तीन केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोल्हापूर वेसवरील केएलई महाविद्यालय, शिंत्रे कॉलनीतील व्हीएसएम जी. आ. बागेवाडी महाविद्यालय आणि जत्राट रोडवरील व्हीएसएम सोमशेखर कोठीवाले अभियांत्रिकी महाविद्यालय अशा तीन केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

एकूण १३६८ परिक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
नीट परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर पोलीसप्र शासनाने कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली,जावी यासाठी पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करत आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा केंद्रांची माहिती घेतली. परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थीची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, चिक्कोडी पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *