Sunday , September 20 2026
Breaking News

पावसामुळे चिखलातून विद्यार्थी, शिक्षकांचा प्रवास

Spread the love

 

 

भीमनगर भागातील परिस्थिती; म्युनिसिपल हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहराबाहेरील भीमनगर परिसरात असलेल्या म्युनिसिपल हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या परिसरातील सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून ये -जा करताना विद्यार्थी आणि शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय गढूळ पाणी साठल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या रस्त्यावरील चिखल हटवून मुरूम अथवा खडी टाकण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकातून होत आहे.
शहरातील भीम नगर परिसरातील रस्त्यावर दोन पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळेजवळ रस्त्याचे काम न झाल्याने पावसाचे पाणी, चिखल आणि रस्त्यावरील माती थेट शाळेच्या आवारात शिरली आहे. परिणामी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.नागरिकांच्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. नगरपालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ते रखडले आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही काम अपूर्णच राहिले आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील माती, कचरा आणि चिखल वाहत येऊन शाळेच्या मैदानात साचला आहे. काही ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरा ये -जा करणेही धोकादायक झाले आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या घटनेची पाहणी करून रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *