Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटकात 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; सरकारची तातडीची पावले

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकमधील 18 ते 25 वर्षे वयोगटातील तब्बल 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी एचआयव्ही (HIV) बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानंतर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उच्च शिक्षण संस्थांमध्ये एचआयव्ही चाचणी आणि समुपदेशन मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्था (KSAPS) यांच्या शिफारशीवरून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांची स्वेच्छेने एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती केली जाणार आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, कर्नाटकाची लोकसंख्या सुमारे 6.11 कोटी असून त्यापैकी अंदाजे 2.60 लाख नागरिक एचआयव्ही बाधित आहेत. त्यातील सुमारे 2.05 लाख जण उपचार घेत आहेत, तर 54 हजारांहून अधिक व्यक्तींना आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहितीच नाही, अशी बाबही समोर आली आहे.

राज्यातील 18 ते 35 वर्षे वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची नोंद करण्यात आली आहे. 2023-24 मध्ये नव्याने नोंद झालेल्या एचआयव्ही रुग्णांची संख्या 44,500 होती, तर 2025-26 मध्ये ती 66,600 वर पोहोचल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षित आरोग्यविषयक जनजागृती आणि वेळेवर तपासणी यावर सरकार विशेष भर देणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *