दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील भात रोपलागणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोपलागणी पूर्ण केली असून आता पिकांच्या जोमदार वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दड्डी, मोदगे, खवनेवाडी, कोट, बेळळकी, धोंडगट्टे, गुडगनट्टी, शट्टीहळ्ळी, सलामवाडी आदी गावांतील …
Read More »भाजपला धक्का : विधान परिषदचे उपसभापती प्राणेश कायदेशीर लढाईत पराभूत; काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांचा ९ मतांनी विजय
बंगळूर : विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांनी भाजपचे उमेदवार तथा तत्कालीन विधानपरिषद उपसभापती एम. के. प्राणेश यांचा ९ मतांनी पराभव केला. निर्णयानंतर विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गायत्री शांतगौडा म्हणाल्या, “सत्याचा नेहमीच विजय होतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले …
Read More »शिरगुप्पी ते ऑस्ट्रियापर्यंत संशोधकाची आकाशाला गवसणी
प्रेरणादायी प्रवासाबद्दल भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन तर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी या छोट्याशा गावातून आकाश आनंदा कुंभार यांनी जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रियातील टेक्निकल विद्यापीठात त्यांची संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यांची ही गरुडझेप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे परिसरात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आकाश कुंभार यांच्या …
Read More »सापाच्या दंशाने शट्टिहळ्ळीत बैल दगावला
दड्डी : हुक्केरी तालुक्यातील शट्टिहळ्ळी येथे सापाच्या दंशामुळे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा सर्जा बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी लक्ष्मण भागोजी आसदे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बैलगाडीतून नाचणीची लागवड करण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यांच्यासोबत घरातील व शेजारच्या …
Read More »विनय कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर
बेंगळुरू : भाजप नेते योगेश गौडर हत्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी आमदार विनय कुलकर्णी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हुबळी-धारवाड खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद नवाज आणि न्यायमूर्ती जी. बसवराजू यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने कुलकर्णी …
Read More »पक्ष मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यालाही संधी; पक्षनिरीक्षक डॉ. के जयकुमार
निपाणीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : एआयसीसीकडून कर्नाटकात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. पक्षाचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच काँग्रेसचा चिकोडी जिल्हा अध्यक्ष निवडला जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉ. के जयकुमार यांनी …
Read More »खानापूरच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी : सुरेश भाऊ जाधव
खानापूर : मलप्रभा नदीतील पाणी विविध योजनांद्वारे अन्यत्र वळविण्याच्या हालचालींमुळे खानापूर तालुक्याच्या पाणीहक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप खानापूर तालुका काँग्रेसचे नेते सुरेशभाऊ जाधव यांनी केला आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा नसून खानापूरच्या अस्तित्वाचा, शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि पुढील पिढ्यांच्या पाणीसुरक्षेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या …
Read More »संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराबाहेरील रोहिदासनगर मधील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. पौर्णिमेनिमित मंदिरातील मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी दिवसभर भाविकांनी दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती. काकड आरती, सकाळी माऊलींच्या मूळ मूर्तीस अभ्यंगस्नान, अभिषेक घालून आरती झाली. त्यानंतर ५१ महिलांच्या उपस्थितीत पारायण झाले. …
Read More »अक्कोळ येथील पार्श्वभूमी विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वितरण
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अक्कोळ गावचे गावकामगार पाटील राजू पाटील होते. प्रारंभी आचार्य श्री १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी शालेय गणवेश आणि शैक्षणिक …
Read More »निपाणी, ममदापूर येथे सिद्धोजीराजे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जोल्ले शिक्षण संस्था संचलित श्रीमंत सिद्धोजीराजे पदवीपूर्व कॉलेजमध्ये सिद्धोजीराजे राजे यांची पुण्यतिथी झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दादाराजे निपाणकर -सरकार उपस्थित होते. यावेळी दादाराजे यांनी सिद्धोजीराजे यांच्या कार्याला उजळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे माहिती दिली. कार्यक्रमास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta