Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावांतील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; १९ नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

  बंगळुरू : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी पार पडला. राजधानी बंगळुरू येथील लोकभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात एकूण १९ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये या विस्तारामुळे मंत्रिमंडळाला अधिक बळ मिळाले आहे. शपथविधी …

Read More »

मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा उपक्रम

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणी विभागाच्या वतीने आज (सोमवार) कुरली, सौंदलगा आणि हालसिद्धनाथनगर (सौंदलगा) येथील मराठी मुलांची व मुलींची शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेल्या पाच वर्षांपासून हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. मराठी …

Read More »

राज्य पोलीस भरती मंडळातर्फे निपाणीत पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत

  निपाणी (वार्ता) : राज्य पोलीस भरती मंडळातर्फे निपाणी शहरात पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. शहरातील निश्चित करण्यात आलेल्या तीन मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासना तर्फे परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील विविध ठिकाणी असलेल्या …

Read More »

अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकाची गैरसोय

  नगरसेवकांचा हल्लाबोल ; नगरपंचायतीची सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना असलेल्या अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खचल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी झालेले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी …

Read More »

एसआयआर फॉर्म वेळेत न दिल्यास ग्राह्य धरले जाणार नाही

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : मतदार यादी परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्यांना हे फॉर्म मिळाले आहेत त्यांनी शनिवार (ता.८) पर्यंत संबंधित बीएलओकडे देणे आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म दिल्यास तो ग्राह्य मानला जाणार नसल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार; 20 आमदारांचा शपथविधी आज सायंकाळी

बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडकडून नव्या मंत्र्यांची यादी अंतिम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (सोमवारी) सायंकाळी 4 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम क्षणी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सध्या उपलब्ध असलेल्या यादीत 20 आमदारांचा समावेश आहे. …

Read More »

हालात्री नदीच्या पुलावर तीन फूट पाणी; खानापूर-हेमाडगा मार्गावरील वाहतूक ठप्प

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून, अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. गेल्या काही …

Read More »

आश्चर्य! ही नव्या मंत्र्यांची यादी की जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची? व्हायरल यादीमुळे राजकीय चर्चेला उधाण

  बेंगळुरू : कर्नाटकाच्या राजकारणात सोमवारी होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीत २० आमदारांची नावे असून, ती जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्तीची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या यादीच्या सत्यतेबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे. व्हायरल पत्रावर एआयसीसीचे …

Read More »

जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  दक्षिण भारत जैन सभेच्या १०४ व्या नैमित्तिक अधिवेशन निपाणी (वार्ता) : जैन समाजाने संस्कार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, सामाजिक सेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासह समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे …

Read More »