खानापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष किशोर पांडुरंग हेब्बाळकर यांनी 13 जुलै 2026 रोजी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील विविध भागांतील युवकांना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत रोशन सुतार (कारलगा) …
Read More »निपाणीतील चिमगावकर गल्ली परिसरात पिसाळलेल्या श्वानाचा दहा जणांना चावा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कुत्र्याने अनेकांचा चावा घेत परिसरात दहशत निर्माण केली आहे. या घटनेत सुनील गुरव, नजमा बागवान, सुलोचना कमते, हजरत बागवान, मिनाज अब्दुस्सलाम बागवान यांच्यासह अनेक वृध्द महिला जखमी झाल्या आहेत. …
Read More »बुधवारच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्याचे मानव अधिकार संघटनेतर्फे आवाहन
निपाणी (वार्ता) : बुधवारी (ता. १५) पासून निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जे-आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयात लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा काही मोजक्या लोकांचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा …
Read More »दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणार निपटारा
तहसीलदार, तालुका पंचायतकडून पाहणी; रयत संघटनेच्या प्रयत्नाला यश निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील समुदायभवनापासून येणारे गटारीचे पाणी रस्त्या वरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार …
Read More »वड्डर समाजातील कुटुंबांना स्थलांतरित न करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : भोज येथील गायरान हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वड्डर समाजातील १६ कुटुंबांना स्थलांतरित करू नये. त्यांना आहे, त्या ठिकाणी राहण्याची परवानगी द्यावा, अशी मागणी संबंधित कुटुंबीयांतर्फे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सर्व्हे क्रमांक …
Read More »निपाणीत महालोक अदालतीत १०४२ खटले निकाली
१ कोटी ४२ लाख वसुल; विभक्त होण्याच्या मार्गावरील तीन जोडपी एकत्र निपाणी (वार्ता) : निपाणी येथील न्यायालय संकुलात या वर्षातील दुसऱ्या आयोजित महालोकअदालातिला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये वरिष्ठ,कनिष्ठ आणि अतिरिक्त न्यायालयाअंतर्गत १३३४ खटले मिटवण्यासाठी घेतले होते. त्यापैकी १०४२ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्यापोटी …
Read More »2028 ची विधानसभा निवडणूक सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढणार; मंत्री सतीश जारकीहोळी यांची स्पष्ट भूमिका
बेळगाव : आगामी 2028 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढवेल, अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडली. सोमवारी बेळगाव जिल्हा परिषद कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या यांना डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पुढील विधानसभा …
Read More »यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबासह १३ रोपवे प्रकल्पांना गती द्या
मंत्री के. जे. जॉर्ज; अंजनाद्रीसह महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर भर बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबासह प्रस्तावित १३ रोपवे प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री के. जे. जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रकल्पांना आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक मंजुरी तातडीने मिळवून त्यांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर त्यांनी …
Read More »मान्सूनची दडी; राज्यावर दुष्काळाचे गडद सावट
२९ टक्के पर्जन्यतूट; खरीप पिके संकटात, पुढील पंधरवडा निर्णायक बेंगळुरू : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा दडी मारल्याने दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टी आणि मलनाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने जलाशयांमध्ये होणारी …
Read More »खानापूरात १६ जुलै रोजी एसआयआर प्रशिक्षण शिबिर; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे मार्गदर्शन
खानापूर : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे गुरुवार, १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्टेशन रोडवरील टाऊन पंचायत हॉल, खानापूर येथे SIR प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर, माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta