खानापूर : खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्ली येथील रहिवासी साहिल रियाजअहमद मोमीन (वय २५) यांची नेपाळमध्ये चाकूने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. या घटनेमुळे खानापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात साहिलचा रूम पार्टनर सद्दाम …
Read More »निपाणीच्या समस्यासंदर्भात १५ पासून फोर -जेआर ह्युमन राईट्स संघटनेचे उपोषण
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जेआर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे बुधवारपासून (ता.१५) तहसीलदार कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा आणि न्यायाच्या अपेक्षांचा लढा आहे. अनेक …
Read More »शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा दोशी विद्यालयात सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी मधील पात्र ठरलेल्या २ व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठवी मध्ये …
Read More »बोरगांवच्या दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधारा उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश मालगावे, रयत संघटनेचे आदिनाथ …
Read More »राज्यात ऑक्टोबर अखेर ग्राम, तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका प्रक्रिया सुरू; पिण्याच्या पाण्यासाठी ११७ कोटींची तरतूद
बंगळूर : राज्यातील ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका ऑक्टोबरअखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खांड्रे यांनी केली. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, नियोजित वेळेत निवडणुका पार पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगळुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्तीसाठी विशेष मोहीम; बीपीएल लाभार्थ्यांना मोठा दिलासा
बेळगाव : पात्रता असूनही विविध कारणांमुळे बीपीएल शिधापत्रिका रद्द झालेल्या हजारो लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाने शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ग्राम वन, कर्नाटक वन तसेच बेळगाव वन केंद्रांवर अर्ज स्वीकारले जाणार असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, पत्रकार संघाच्या पुढाकारातून सीमा प्रश्नासंदर्भात राबविण्यात आलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेतील …
Read More »विद्यार्थ्याअभावी 274 सरकारी शाळांना टाळे!
इंग्रजी माध्यम व खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल; खानापूर तालुक्यातील तीन शाळाही बंद बेळगाव : खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता ओढा, ग्रामीण भागातील स्थलांतर आणि सरकारी शाळांमधील सातत्याने घटणारी विद्यार्थीसंख्या यामुळे राज्यातील 274 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या यादीत खानापूर तालुक्यातील तीन …
Read More »कर्नाटक राज्यात बस प्रवास महागणार?; तिकीटदरवाढीच्या हालचालींना वेग
चारही परिवहन महामंडळांकडून दरवाढीचे प्रस्ताव : तज्ज्ञ समिती १५ दिवसांत अहवाल देणार बेंगळूरू : राज्यातील लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारही राज्य परिवहन महामंडळांच्या बस तिकीटदरात वाढ करण्याच्या दिशेने राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली असून, दरवाढीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय …
Read More »दुभाजकाला कार आदळून भीषण अपघात; आईसह दोन मुलांचा मृत्यू, पती गंभीर
विजयपूर (प्रतिनिधी) : विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातात एका कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची ओळख सत्यवेणी (३८), त्यांचा मुलगा हरिवेंकटराम (२०) आणि जश्वंत (१८) अशी झाली आहे. तर राघवेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta