बेळगाव : सुवर्णसौध येथे झालेल्या बेळगाव विभागीय प्रगती आढावा बैठकीत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या निधीचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी करावा, असे निर्देश त्यांनी दिले. राज्यात …
Read More »बेळगाव सीमावाद : महाराष्ट्राने तणाव वाढवणाऱ्या हालचाली करू नये; मंत्री प्रियांक खरगे यांचा इशारा
बेंगळुरू : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी महाराष्ट्र सरकारला बेळगाव सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात तणाव निर्माण होईल अशा कोणत्याही हालचालींना पाठिंबा देऊ नये, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावाद प्रकरणाच्या लवकर सुनावणीसाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येईल, असे विधान केल्यानंतर …
Read More »क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला पुन्हा उधाण; डॉ. अंजली निंबाळकरांकडून आ. विठ्ठल हलगेकरांवर निशाणा
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला नव्याने उधाण आले असून, खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. निंबाळकर …
Read More »यल्लापूरजवळ भीषण अपघात : क्रूझर-ट्रकची समोरासमोर धडक; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात अरबैळ घाटातील बळगार परिसरात गुरुवारी (९ जुलै) पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (तुफान क्रूझर) आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसवराज (४८), अभिषेक ईश्वर (२८), अक्षय …
Read More »गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांनी कागदपत्रांसाठी खानापूरला येऊ नये; गावातील अंगणवाडी केंद्रातच कागदपत्रे जमा करा
पंच हमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचे आवाहन खानापूर : तालुक्यातील गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी खानापूर येथील सीडीपीओ कार्यालयात येऊ नये. लाभार्थ्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिकांकडेच कागदपत्रे जमा करावीत. सीडीपीओ कार्यालयात ही कागदपत्रे स्वीकारली जाणार नसल्याने महिलांनी विनाकारण हेलपाटे घालू नयेत, असे …
Read More »पावसाळ्यात सतर्क राहा, विजेचा अपघात टाळा
हेस्कॉमचे आवाहन; तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून राहा दूर निपाणी (वार्ता) : पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडतात. अशावेळी काही प्रसंगी अनेक दुर्घटना ही घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेण्याचे …
Read More »निपाणी भागात पावसाचा अंदाज बांधणे कठीण
तालुक्यातील ग्रामपंचायती पर्जन्यमापक यंत्राविना ; शेतकरी, नागरिकातून नाराजी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला तालुकाच्या दर्जा मिळाला आहे. तालुका पातळीवरील सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू झाली आहेत. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही. याशिवाय येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क करात असलेले पर्जन्यमापकी ही …
Read More »हेस्कॉमच्या खासगीकरणाला मुख्यमंत्र्यांचा रेड सिग्नल
रयत संघटनेचे आंदोलनाला यश ; राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली होती. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी …
Read More »निपाणीतील खराब सीडी वर्क ‘मॅनहोल’ ठरताहेत जीवघेणे
शहरातील विविध रस्त्यावरील परिस्थिती; लहान मोठे अपघात सुरूच निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी ‘मॅनहोल’ उघड्या अवस्थेसह खराब झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या उघड्या ‘मॅनहोल’च्या लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ‘मॅनहोल’ मध्ये पाणी साचल्यास किंवा अंधार …
Read More »एसआयआर प्रक्रियेत मराठी व समितीप्रेमी मतदारांनी आपले घर हाच आपला बूथ गाव, गल्ली हाच वॉर्ड म्हणून कार्यरत राहावे
धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन निवडणूक आयोगाने चालू केलेल्या एसआयआर (मतदार फेर निरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे व बोगस किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta