निपाणी (वार्ता) : गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील बस स्थानकावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्याच्या आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह जवळ पाणी साठल्याने प्रवाशांना ये -जा करणे कठीण झाले …
Read More »दमदार पावसामुळे यमगर्णी, वेदगंगेचे पाणी पात्रबाहेर
कोकण भागातील पावसाने पातळी वाढली; विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले असून गवताचे गड्डे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. तर नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी ग्रामपंचायत …
Read More »पृथ्वी सूर्यापासून सोमवारी जाणार सर्वाधिक दूर
‘अपसूर्य’ स्थितीचा अनुभव; डोळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या निपाणी (वार्ता) : पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून ती लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर वर्षभरात कमी-अधिक होत असते. साधारणपणे ३ जानेवारीच्या सुमारास हे अंतर सर्वात कमी असते. या स्थितीला उपसूर्य (पेरिहेलियन) असे म्हणतात. त्यानंतर हे अंतर वाढत जाऊन …
Read More »निपाणी नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्षपदी लहु मधाळे, उपाध्यक्षपदी विजय कुरंगी यांची निवड
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नगरसेवा कर्मचारी संघाच्या अंतर्गत येणाऱ्या येथील नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नगरपालिकेतील प्रथम दर्जा सहाय्यक लहू मधाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय कुरंगी, सचिवपदी राहुल कदम तर खजिनदारपदी नगरपालिकेची लेखा अधीक्षक नागेंद्र बहाद्दुरी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा नगरपालिका आयुक्त गणपती …
Read More »विद्यामंदिरची निपाणीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद
दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात ९ गुणवंतांचा विक्रम; भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे पारितोषिके निपाणी (वार्ता) : विद्यामंदिर निपाणी शाळेच्या सन १९४४ पासूनच्या इतिहासात प्रथमच दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी “भूमी वात्सल्य” फाउंडेशनतर्फे येथील साई चैतन्य लेटेक्स कॉलनीत …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधींपदी लोकेश मुगळे याची निवड
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालित येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सालची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला. मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी उद्घाटन करून आपला मतदान हक्क बजावला. …
Read More »‘मोबाईल सोडा, पुस्तक धरा’ : विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारची मोठी मोहीम
बेंगळूरू : विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वाढता आणि अनिर्बंध वापर आता शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान ठरत आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे अभ्यासावरील लक्ष विचलित होत असून वाचनाची सवय, एकाग्रता, आकलनशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदविले आहे. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने “मोबाईल सोडा, पुस्तक धरा” …
Read More »खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर; मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली
खानापूर : तालुक्यातील कणकुंबी, जांबोटीसह पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम मलप्रभा नदीच्या पाणीपातळीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्याने मलप्रभा नदी वेगाने प्रवाहित होत असून, पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या …
Read More »खानापूरात मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळून जामगाव दोन दिवसांपासून अंधारात
बेळगाव : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जामगाव परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, जामगावसह परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत …
Read More »मोहिशेत गाव आजही चिखलाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा संताप
खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta