निपाणी (वार्ता) : वाढत्या तापमानाने, अनियमित पावसाने आणि झपाट्याने कमी होत चाललेल्या हरित क्षेत्राने जगासमोर गंभीर पर्यावरणीय संकट उभे केले आहे. अशा परिस्थितीत बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. गावातील रानेवाडी रस्त्याकडील गायरान जमिनीवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून “हरित गाव, समृद्ध गाव” या संकल्पनेला …
Read More »तीव्र विरोधापुढे टाटा पॉवरची माघार; कर्नाटकातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाला ब्रेक
बेळगाव : कर्नाटकातील वीज वितरण व्यवस्थेच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला राज्यभरातून झालेल्या तीव्र विरोधामुळे अखेर टाटा पॉवर कंपनीला माघार घ्यावी लागली आहे. कर्नाटक वीज नियामक आयोग (केईआरसी) यांनी प्रस्तावावर आक्षेप नोंदविल्यानंतर कंपनीने वीज वितरणाचे कंत्राट मिळविण्याचा प्रस्ताव मागे घेतला. या निर्णयामुळे हेसकॉमसह राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांमध्ये …
Read More »हिटणी येथील सरकारी मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदलीची मागणी; अन्यथा ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिटणी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कथित बेजबाबदार वर्तणूक आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एका ग्रामस्थाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा ३ …
Read More »अर्जुननगर मधील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा डंका
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 2025-26च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी वडगुले हिने राज्यात सहावा तर तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)मध्ये तब्बल 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र …
Read More »डॉक्टर दिनानिमित्त इंजिनिअर-समाजसेवक प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेकडून गौरव
खानापूर : डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य व व्यवसायाने इंजिनिअर असलेले प्रसाद विठ्ठल पाटील यांचा केएलईच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. प्रसाद पाटील हे …
Read More »नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘प्रजा सेवा’ नवे खाते; महिन्यातून दोन दिवस मंत्री थेट जनतेच्या भेटीला
बेंगळुरू : राज्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ‘प्रजा सेवा’ या नावाने स्वतंत्र खाते स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या खात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री महिन्यातून दोन दिवस थेट नागरिकांच्या …
Read More »प्रथम स्मृतिदिनानिमित्त : संघर्ष, कर्तृत्व आणि माणुसकीचा सुगंध जपणारे कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर
“चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलविला… शून्यातून विश्व उभे केले, पण स्वतःसाठी जगणे मात्र विसरलात…” दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आम्हा सर्वांना कायमचे पोरके करून जाणारे माझे थोरले बंधू कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. पांडुरंग यांचा जन्म १० मार्च १९७० रोजी तिवोली …
Read More »चोर्ला मार्गावरील बससेवेच्या निवेदनाची दखल; दहा दिवसांत नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन
गुंजी येथे बस थांब्यासाठी निवेदन खानापूर : बेळगाव बसस्थानक ते चोर्ला नवीन बससेवा सुरू करावी तसेच या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी सरकारी हमी योजना अंमलबजावणी समिती, खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल हमी योजनेच्या …
Read More »घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६१९ घरांचे हस्तांतरण करा, अन्यथा आंदोलनाची तयारी : विलास गाडीवड्डर
निपाणी (वार्ता) : सत्ता आणि हाती मंत्रिपद असूनही आमदार शशिकला जोल्ले यांना सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांना केवळ खोटे अश्रू दाखवून गरीबांचा राजकारण आणि त्यांच्या मतांसाठी वापर करावयाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यांना खरोखरोखरच आपल्या नव्हे, तर गरीबांच्या स्वप्नाची काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या अट्टाहासाप्रमाणे ६०० …
Read More »आरोग्य सेवेबाबत सहकाराची भूमिका महत्त्वाची
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्सपूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल, असे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta