Friday , July 3 2026
Breaking News

आरोग्य सेवेबाबत सहकाराची भूमिका महत्त्वाची

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्सपूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल, असे मत सहकार रत्न ‌उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीडीसीसी बँक बेळगाव, श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बोरगाव (मल्टि-स्टेट),अरिहंत हॉस्पिटल, बेळगावी, लठ्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक महाविद्यालय, बेडकिहाळ-शमनेवाडी आणि अरिहंत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.३) बोरगाव अरिहंत सभागृहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
निरोगी व सुदृढ समाज निर्मिती ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी प्रयत्नशील असते. आधुनिक वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिर हाती घेण्यात येत आहे. सहकार सप्ताहाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम हाती घेतले असून या शिबिराशाही लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले.
अरिहंता संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील म्हणाले,युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिबिरामध्ये संगणकावरती डोळे तपासणी, इसीजी ,सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी, मधुमेह, रक्तदाब यासह अन्य तपासणी मोफत करण्यात आल्या सुमारे ७०० हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरास नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, अशोक पाटील, मनोजकुमार पाटील, शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसणावर, अरिहंत दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, सभापती प्रदीप माळी, अभय करोले, बाळू अफराज, पिरगौडा पाटील, जयपाल नागावे, भुजगौडा पाटील, अजित कांबळे, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे , कृषी संघाचे सी.इ.ओ.आर.टी. चौगुला, बाबासो वठारे, बी. जे. पाटील, राजेंद्र एदमाळे, दर्शन पाटील, सुरेश बंकापुरे, राजू गजरे, त्यांच्यासह डॉ. युवराज यड्रावी, डॉ.पूजा कुलकर्णी, डॉ.द्राक्षायणी, डॉ. शिवानंद कुंभार, डॉ. अमोघ डी, डॉ.लक्ष्मी पाटील, डॉ. शबनम देसाई, डॉ. अश्विनी निरास, डॉ. मनीकांत माळेगाव, डॉ. संदीप सडके, राकेश फिरगन्नावर यांच्यासह स्थानिक डॉक्टर्स, अरिहंत परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत संस्थेने उंचावले सर्वसामान्यांचे जीवन

Spread the love  सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *