Tuesday , August 25 2026
Breaking News

विद्या भारती फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ शाळेने चारी गटाचे विजेतेपद पटकावित चौकार मारला. आता या सघाची राज्य फुटबॉल स्पधसाठी निवड झाली आहे.
प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने भातकाडे स्कूलचा पेनाल्टी शूटआउटवर 2-1 पराभव केला विजयी संघाच्या अद्विता दळवी राजवीर घोरपडे यांनी गोल केला
मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेला विजयी घोषीत करण्यात आले.
माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 2-0असा पराभव केला. विजयी संघाच्या संचित धामणेकर श्रेयस चंदन यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा शाळेने भातकाडे स्कूलचा 2-0असा पराभव केला. विजयी संघाच्या सृष्टी सातेरी व निधीशा दळवी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

सकाळी स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, शाळेचे माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल मुल्ला, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, विद्याभारती शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, बापूसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, हर्ष रेडेकर, ओमकार गावडे, मंजुळा, शिवकुमार सुतार, बसवंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उविजेत्या सघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच मानस नायक, आदित्य सानी, स्वयम काकतकर, प्रणव देसाई, श्रीकांत कांबळे, स्वरूप हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *