Monday , September 21 2026
Breaking News

अर्जुननगर मधील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा डंका

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 2025-26च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी वडगुले हिने राज्यात सहावा तर तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)मध्ये तब्बल 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. त्यापैकी प्रतीक कदम याने 300 पैकी 260 गुण, शौर्य पाटील 258 गुण, शिवकुमार झळके 256, साईराज जाधव 252, ज्ञानेश्वरी पोवार 246, गिरीजा कुंभार 238, अर्णव पाटील 236, शरयू कुंभार 234, ‌प्राजक्ता कुंभार 232, गौरी भोसले 232, श्रावणी यादव 232, ऋषीराज कदम 230, प्रीतम गेंगे 228, आराध्या पाटील 226, शिराज नदाफ 224, अन्विक्षिक कांबळे 222, पृथ्वीराज दबडे 220, समर्थ पाटील 218, प्रांजली दुरडे 216, काव्यांजली चौगुले 214, श्रेया कांबळे 208 या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान पटकाविला आहे.
इयत्ता अर्णव ऱ्हाटवळ याने जिल्ह्यात 4 था येण्याचा मान मिळविला सदर यशस्वी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्षआशिषभाई शाह यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले, एस. डी. तोडकर, व्ही. आर. पाटील, आर. डी. देसाई, पी. एस. सावळवाडे, आर. आर. कपले यांच्यासहर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले.

 

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *