Sunday , September 20 2026
Breaking News

छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकासासाठी श्रीराम सेना आणि कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाची संयुक्त भूमिका

Spread the love

 

केकेएमपी महिला अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी मुतालिक यांची सुदीर्घ चर्चा !

बेळगाव : श्रीराम सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केकेएमपी महिला अध्यक्षा तथा मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान होदगीरे (औदगीर) येथील स्वराज्याचे मूळ पुरुष छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बेळगावातील मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्याचाही गौरव करण्यात आला.

बैठकीदरम्यान बेळगावमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून आणि केकेएमपी महिला अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत श्री. प्रमोद मुतालिक यांनी विशेष समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
डॅा सोनाली सरनोबत यांनी मुतालिक यांचा यथोचित गौरव करून सन्मान केला!

होदगीरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासाचे काम गेल्या काही काळापासून रखडलेले आहे. काही दिवसांपूर्वी बेळगावच्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन शासनाकडे या स्मारकाच्या सर्वांगीण विकासाची मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर, आगामी काळात छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी श्रीराम सेना आणि मराठा समाज यांनी संयुक्तपणे शासन दरबारी तीव्र पाठपुरावा करण्याबाबत चर्चा केली.

यावेळी श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, “बेळगावमध्ये डॉ. सोनाली सरनोबत कर्नाटक क्षत्रिय मराठा समाज अतिशय कौतुकास्पद कार्य करत आहेत. छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास हा आपल्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेशी निगडित विषय आहे. या कार्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडे ठामपणे आणि ताकदीने मागणी मांडणार आहोत.”

या बैठकीस श्रीराम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच डॉ. सोनाली सरनोबत आणि मराठा समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *