Friday , November 6 2026
Breaking News

कर्नाटक

चव्हाण वाड्यातून गलेफ घालून सरकार घराण्यातील शिळा उरूस साजरा

    निपाणी (वार्त) : कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा शिळा उरूस गुरुवारी (ता.२४) पहाटे ३ वाजता पार पडला. त्यानिमित्त येथील चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांच्या चव्हाण वाड्यातून मानाचा गलेफ व गंध दर्गा मंडप मध्ये …

Read More »

६२ गावे “ईएसझेड” क्षेत्रातून वगळण्याची म. ए. समितीची मागणी; उद्या निवेदन देणार

  खानापूर : पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या “ईएसझेड” प्रस्तावित अधिसूचनेत खानापूर तालुक्यातील ८५२ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ६२ कंदाय गावांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करून ही गावे “ईएसझेड”च्या जाचक अटींतून पूर्णपणे वगळावीत, या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना आक्षेपाचे निवेदन देण्यात …

Read More »

ओंकार गणेश मंडळातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात

  पैठणी साडीची मानकरी सौ. रेखा शिवाजी बुवा दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी : येथे ओंकार गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा व कौशल्याधारित उपक्रमांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण …

Read More »

एसएसएलसी परीक्षेची पूर्वतयारी; सहामाही परीक्षाही मुख्य परीक्षेच्या धर्तीवर

  प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी शाळेच्या लॉगिनवरून प्रश्नपत्रिका; ओटीपीद्वारे डाउनलोडची व्यवस्था बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएसएलसी बोर्ड परीक्षेची आतापासूनच प्रभावी पूर्वतयारी करता यावी, तसेच मुख्य परीक्षेच्या पद्धतीचा सराव व्हावा, यासाठी यंदाची सहामाही परीक्षा एसएसएलसी परीक्षेच्या धर्तीवर घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहामाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात …

Read More »

सफाई कामगारामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित

  सहकाररत्न उत्तम पाटील ; बोरगावमध्ये सफाई कामगारांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगाव पट्टण पंचायत क्षेत्रातील नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या विविध सेवा सुरळीतपणे मिळून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी साफसफाई कर्मचारी व कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छता, देखभाल, सार्वजनिक सुविधा, विविध नागरी मुलभूत कामांमध्ये सफाई कामगार प्रामाणिकपणे व …

Read More »

निपाणी दर्गाह उरुसातील शर्यतीमध्ये ननदीतील अभी स्वामी यांची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसानिमित्त बुधवारी (ता.२३) आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये ननदी येथील अभी स्वामी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख १० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीत वाघापूर येथील साताप्पा आरडे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवून रोख ७ हजार रुपयांचे बक्षीस …

Read More »

चापगांव उच्च प्राथमिक शाळेच्या शताब्दी निमित्त प्रकाशित ‘शतपर्व’ स्मरणिकेचे लोकार्पण

  चापगाव : मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी चापगांव येथील उच्च प्राथमिक शाळा येथे स्मरणिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करुन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शतपर्व’ स्मरणिकेचे पुनर्प्रकाशन तथा लोकार्पण करण्यात आले. चापगांव येथील प्राथमिक शाळेने तब्बल शंभर वर्षांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा जपत अनेक पिढ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. या प्रदीर्घ …

Read More »

निपाणी दर्गाह उरुसानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    आज शिळा, बाशी उरूस ; पाकाळणी कार्यक्रमाने उरूसाची सांगता निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.२२) संदल बेडीचा उरुस पार पडला. बुधवारी (ता.२३) भर उरूस पार पडला. त्यानिमित्त नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी …

Read More »

परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांकडे जमा करा : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

    बेंगळुरू : परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी येत्या १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात बंदुका जमा कराव्यात, असे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अरण्यालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना केले आहे. अरण्यालगत राहणाऱ्या काही नागरिकांकडे परवानगीशिवाय बंदुका असून, त्यांचा वापर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वन आणि वन्यजीवांच्या …

Read More »

‘नाचता येईना, अंगण वाकडे’; आमदारांवर माजी आमदार निंबाळकर समर्थकांचा निशाणा

  पालकमंत्र्यांचा कार्यक्रम, केडीपी बैठक, कुसमळी पाणी उपसा आणि वाळू प्रश्नावरून सवाल खानापूर : तालुक्यातील विविध प्रश्नांवरून आमदारांवर टीका करताना माजी आमदार समर्थकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘पालकमंत्र्यांचा कार्यक्रम माजी आमदारांनी रद्द केला’ असा दावा कन्नड वृत्तपत्रातील बातमीत करण्यात आल्याचा उल्लेख करत, पालकमंत्र्यांची भेट घेऊन कार्यक्रम कोणी अडविला, …

Read More »