Friday , November 6 2026
Breaking News

कर्नाटक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर रयत संघटनेचा एल्गार

  निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या हक्कांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर मंगळवारी (ता.२९) आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी(ता.२९) सकाळी ७ वाजता कोगनोळी टोल नाका …

Read More »

जीवनाच्या लढाईसाठी सर्कसीमध्ये कसरती!

  कोप्पळ येथील पवार कुटुंबीयांचे हाल : अस्तित्व टिकवण्यासाठी लढा निपाणी (वार्ता) : एकेकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा आणि मनोरंजनाचा केंद्रबिंदू असलेली सर्कस आता काळाच्या ओघात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. गावात सर्कस दाखल झाली की निर्माण होणारा उत्साह, तंबूबाहेरची गर्दी आणि थरारक कसरतींची उत्सुकता आजच्या डिजिटल युगात कमी होत चालली …

Read More »

नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी लोटला जनसागर; चेंगराचेंगरीचा प्रकार 

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील प्रसिद्ध नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी भक्तांची मोठी गर्दी झाली. सुट्टीचा दिवस असल्याने पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनाच्या रांगेत काही काळ तुफान गर्दी झाली. यावेळी भाविकांमध्ये ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ तणावाचे …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

  निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या हक्कांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास स्थानासमोर मंगळवारी (ता. २९) आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी …

Read More »

अलोट गर्दीत गणरायाला निरोप; ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर

    साउंड सिस्टीम, ढोल पथकाच्या गजरात मिरवणुका निपाणी (वार्ता) : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, साऊंड सिस्टिमवरील आवाज, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी …

Read More »

कुसमळी पाणी उपसा प्रकरणावरून खानापूरच्या आमदारांना सवाल; ‘तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भूमिका स्पष्ट करा’

  खानापूर : कुसमळी येथील मलप्रभा नदीतून बेळगाव तालुक्याकडे पाणी वळविण्याच्या प्रकल्पावरून खानापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी यापूर्वी हा प्रकल्प त्यांच्या आमदारकीच्या काळात मंजूर झालेला नसून, आधीच्या आमदारांच्या कार्यकाळात मंजूर झाल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कुसमळी पाणी उपसा प्रकरणावरून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या समर्थकांकडून …

Read More »

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा : खानापूर म. ए. समितीची निवेदनाद्वारे मागणी

  बेळगाव : यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खानापूर तालुक्यातील खरीप पिके करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, यासाठी यावर्षी खानापूर तालुक्याला कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत जाहीर करावी, या आशयाचे निवेदन आज शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात …

Read More »

पारदर्शी कारभार केल्यास संस्थेची प्रगती

  सहकारत्न उत्तम पाटील : बेनाडीत रयत को -ऑप. सोसायटीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आर्थिक संस्था सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी, लहानमोठे उद्योग व्यवसायिक आणि गरजूंना पद निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली आहे. भविष्यात विश्वासाला तडा जाऊ न देत पारदर्शी कारभार करावा. रयत …

Read More »

बेंगळुरूत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा उत्साहात

  विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; १७ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव बेंगळुरू : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच आर्ट एब्स्ट्रेक्ट क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड परिसरात ‘इको फ्रेंडली गणेश मूर्तीकला कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. १५ ते २९ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यशाळेला …

Read More »

हलगा येथे एनआरएलएम संजीवनी संघाच्या इमारतीचे उद्घाटन उत्साहात

  हलगा : राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) अंतर्गत हलगा (ता. खानापूर) येथे संजीवनी संघाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत ईओ रमेश मेत्री होते. यावेळी जीपीएलएफ अध्यक्षा तथा एनआरएलएम तालुका स्तर सचिव आणि हलगा संजीवनी संघाच्या अध्यक्षा प्रवीणा सुनील फटाण, पीडीओ निंगाप्पा आस्की, तालुका पंचायत …

Read More »