Sunday , October 4 2026
Breaking News

परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांकडे जमा करा : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love

 

 

बेंगळुरू : परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी येत्या १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात बंदुका जमा कराव्यात, असे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अरण्यालगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना केले आहे.

अरण्यालगत राहणाऱ्या काही नागरिकांकडे परवानगीशिवाय बंदुका असून, त्यांचा वापर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जंगल परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हजारो कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोणाच्या चिथावणीला बळी पडून जंगलात जाऊन वन्यप्राण्यांची शिकार करू नये, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

शिकार करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांपासून सावध राहा, कारण पुढे त्यांच्याकडूनच संबंधित व्यक्तींना गुन्ह्यात अडकवले जाण्याची शक्यता असते, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही शिवकुमार यांनी केले. गरज असलेल्या पात्र व्यक्तींना सरकारच्या नियमांनुसार बंदुकीचा परवाना दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. भारतात शस्त्र परवान्यांसाठी आर्म ऍक्ट 1959 आणि संबंधित नियम लागू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

एसएसएलसी परीक्षेची पूर्वतयारी; सहामाही परीक्षाही मुख्य परीक्षेच्या धर्तीवर

Spread the love  प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी शाळेच्या लॉगिनवरून प्रश्नपत्रिका; ओटीपीद्वारे डाउनलोडची व्यवस्था बेळगाव : दहावीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *