Monday , August 17 2026
Breaking News

अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकाची गैरसोय

Spread the love

 

नगरसेवकांचा हल्लाबोल ; नगरपंचायतीची सभा

निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना असलेल्या अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खचल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी झालेले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ अमृत-२ योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
बोरगाव नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी एस. बी. तोडकर यांनी विषयाचे वाचन केले. नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी, शहराच्या गटार पाणीनाही
संस्करण घटक निर्मितीसाठी ४ कोटी ८४ लाख रुपयांचा प्लांट होणार आहे. यामध्ये १ कोटी २० लाख नगरपंचायतीकडून मागणी करण्यात आले असून याबाबत नगरसेवकांना पहिल्यांदा कळविणे गरजेचे होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कोणतीच माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे याबाबत ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे आवाहन केले.
नगरसेवक शरद जंगटे यांनी, उन्हाळ्यात पाणी समस्या होती पण म्हणावे तसे उपाययोजना राबविलेल्या नाहीत. गायरान व गावठाणमधील मंदिरांचा सर्वे होणे गरजेचे आहे. गाळे भाडे वाढ अजूनही झाली नसल्याचे म्हटले. नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी, सफाई कर्मचाऱ्यांना दुचाकी देण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. सभेस उपनगराध्यक्षा रुक्साना अफराज, सभापती प्रदीप माळी, माणिक कुंभार, पिंटू कांबळे, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे, जावेद मकानदार, सुवर्णा सोबाने, रोहित पाटील, संगिता शिंगे, गिरिज़ा वठारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोपट कुरळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील

Spread the love  बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *