Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजनेची पडताळणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्याची सुप्रिया पाटील यांची मागणी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाणार असून, या प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी केपीसीसी सदस्य व कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी येथील सीडीपीओ कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. योजनेतील पात्र लाभार्थींना अडचण येऊ नये आणि पडताळणी प्रक्रिया सुलभ व सुरळीतपणे पार पडावी याबाबत सूचना देण्यात आल्या.
सुप्रिया पाटील म्हणाल्या, योजनेचा गैरवापर टाळून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने लाभार्थी महिलांच्या माहितीची पडताळणी सुरू आहे. याशिवाय लाभार्थी हिलेच्या स्वतःच्या नावावर मोबाईल नंबर/सिमकार्ड असणे आणि तो मोबाईल नंबर बँक खाते व आधार लिंक असणे याबाबतही माहिती देण्यात आली. यामुळे लाभाची रक्कम योग्य लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
काही बँकांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीसरकार कडे प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे सयोजनेचा लाभ मिळत नाही आहे. या बाबतही चर्चा झाली. अशा परिस्थितीत लाभार्थींनी अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून योग्य बँक खात्याबाबत माहिती घेऊन आवश्यकतेनुसार नवीन खाते उघडावे, तसेच पोस्ट ऑफिस खात्याचाही पर्याय उपलब्ध असल्याची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले. पडताळणी बायोमेट्रिक व फेस स्कॅन स्वरूपात होणार असल्यामुळे यावेळी ती महिला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटल यांनी केले.

यावेळी धनाजी चव्हाण, युवक काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव, उपाध्यक्ष प्रशांत हांडोरी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *