







‘विवेकानंद’चे चेअरमन कुमार पाटील यांची पत्रकार परिषद
बेळगांव : १५ वर्षे समर्पणाची… नव्या यशाकडे वाटचाल अशी बिरुदावली असलेल्या कॉलेज रोड येथील विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जगन्नाथराव जोशी सभागृह, गुडसशेड रोड, बेळगांव येथे होणार आहे, अशी माहिती विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचे चेअरमन कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोसायटीच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना पाटील म्हणाले,
स्थापनेपासून सोसायटीने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. सोसायटीचे एक हजार भागधारक असून १९ कोटी ११८२ रुपयांचे खेळते भांडवल आहे. १७ कोटी ८५ लाख ७० हजार ८८२ रुपयांच्या ठेवी असून १७ कोटी ८७ लाख ५८ हजार ४३४ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सोसायटीने २ कोटी ९५ लाख ७० हजार ३३७ रुपयांची गुंतवणूक केली आहे. वार्षिक उलाढाल ५८ कोटी ७६ लाख ५७ हजार ४३१ रुपयांची आहे. संस्थेकडे २८ लाख ५८ हजार ६४८ रुपयांचा राखीव निधी आहे. सोसायटीला ९ लाख ५२ हजार १३९ रुपयांचा नफा झाला असून यंदा बारा टक्के लाभांश देण्याचे प्रस्तावित आहे. सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच संस्था ही प्रगती करु शकली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांच्यासह अविनाश कुलकर्णी, प्रशांत पाटील आदी संचालक, सेक्रेटरी पद्मा बाडकर, विलास पेडणेकर व इतर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta