Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारप्राप्त गजानन लाड यांचा मच्छेत विविध संस्थांतर्फे सत्कार

Spread the love

 

मच्छे : मच्छे गावचे सुपुत्र व उद्योजक गजानन लाड यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मच्छे गावातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली, मच्छे यांच्या वतीने गजानन लाड यांना श्री गणेशाची आरती करण्याचा मान देण्यात आला. आरतीनंतर मंडळाचे अध्यक्ष विनायक चौगुले व सागर जैनोजी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गजानन लाड यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने अध्यक्ष सुशील धामनेकर व उपाध्यक्ष शिवाजी नावगेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनेही अमोल लाड, संभाजी कणबरकर आणि गजानन छप्रे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गजानन लाड यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना गजानन लाड यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील विविध अनुभव उपस्थितांसमोर मांडले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी तब्बल १४ वर्षे काम केलेल्या पॉलीहेड्रॉन कंपनीचे संस्थापक स्वर्गीय सुरेश हुंदरे सर यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि शिकवणीला दिले. “महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे; मात्र या यशामागे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेले अनमोल ज्ञान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना लाड यांनी “पैसा कमावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पैसा महत्त्वाचा आहेच; मात्र आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे,” असा मोलाचा संदेश दिला.

यावेळी नागराज बाळेकुंद्री, संतोष जैनोजी, मारुती बेळगावकर, सुहास गोरल, साईनाथ शिरोडकर, बजरंग धामनेकर, रामचंद्र चलवेटकर, मोहन उसुलकर, गजराज पाटील, नागेश चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *