







बेळगाव : ओडिसातील भुवनेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया स्लिंगशॉट स्पर्धेत (नेमबाजी) बसरीकट्टी गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी यांनी पंधरा वर्षे वयोगटात स्लिंगशॉट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचा गावांमध्ये सत्कार करण्यात आला
बसरीकट्टी गावातील गावच्या प्रवेश भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रज्वल हिरोजी याचा माजी एसडीएमसी अध्यक्ष आणि क्वान्टक्टर ज्योतिबा सांबरेकर यांच्या हस्ते शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी पुंडलिक कोंडसकोप, परशराम सांबरेकर, गंगाराम शेरेकर, राजू हिरोजी, अजय कोंडसकोप, लक्ष्मण शरेकर, बसवानी शेरेकर, आजोबा अनंत हिरोजी, विनायक देसाई, हेमराज हिरोजी, तसेच अष्टविनायक युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रज्वल हिरोजी हा आजरा येथील डायनॅमिक पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे बसरीकटटी गावामध्ये आल्यानंतर गावच्या वतीने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल गावच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी एसडीएमसी अध्यक्ष आणि कॉन्ट्रॅक्टदार ज्योतिबा साबंरेकर बोलताना म्हणाले की, प्रज्वल हिरोजी नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे आमच्या बसरीकट्टी गावचे नाव रोशन केले आहे. लहान वयामध्ये प्रज्वल हिरोजीने स्लिंगशॉट सारख्या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी दाखवून गावचे नाव उज्वल केले आहे. त्याबरोबरच हिरोजी घराण्याचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांनी यापुढेही अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन गावचे नाव उज्वल करावे अशा त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितानीही त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार प्रज्वल हिरोजी यांचे वडील भारतीय सैन्य दलातील हवालदार लक्ष्मण हिरोजी यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta