






बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही जायंट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ करून करण्यात आला.
बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते नेटपूजन करण्यात आले. यावेळी फेडरेशन ऑफिसर प्रवीण त्रिवेदी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी आणि फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, उपाध्यक्ष अरुण काळे, डायरेक्टर राहुल बेलवलकर, आकाश लाटूकर, जयवंत पाटील, प्रदीप चव्हाण आणि सचिव विश्वास पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण शिंदे यांनी जायंट्स सप्ताहाचा उद्देश स्पष्ट करून संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

Belgaum Varta Belgaum Varta