Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी मतदारसंघातील एसआयआर कामकाज समाधानकारक असल्याची सुप्रिया पाटील यांची माहिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील यादीची सखोल फेरतपासणी म्हणून एसआयआरचे कामकाज सुरू होते. शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वीच हे काम अंतिम टप्प्यात आल्याची बाब समाधानकारक असल्याची माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी दिली.

पुढील काळातील निवडणुकीच्या दृष्टीने एस आय आर चे कार्य महत्वपूर्ण आहे. शहर आणि ग्रामीण भागात हे काम सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक कुटुंबियांनी आपली योग्य माहिती दिल्यास मतदानाचा हक्क बजावता येतो. अन्यथा यादीतून नाव वगळले जाणार आहे. त्यापासून वर सर्वच कुटुंबीयांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
या कामासाठी मार्गदर्शन केलेल्या आधिकारी कविता वारंगळ, त्यांना सहकार्य करणारे तहसिलदार सुरेश मुंजे व कामकाजाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कामात स्थानिक पातळीवर कष्ट व श्रमाचे काम केलेले बूथ लेव्हल अधिकारी (बी. एल. ओ यांच्याबद्दल सुप्रिया पाटील यांनी सद्भावना व्यक्त केल्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *