Sunday , September 20 2026
Breaking News

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणात तपासाला वेग; दोन गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

Spread the love

 

 

बेळगाव : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये 14 जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी अधिक तीव्र केला असून, या प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहन पोकळे (रा. पुणे) आणि आदिराज अनिल सुतार (रा. कामत गल्ली, बेळगाव) अशी आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.

प्राथमिक तपासानुसार, सुरेश जलगार आणि प्रफुल्ल पाटील यांच्यातील आर्थिक व्यवहारातून हा गोळीबार घडल्याचा संशय असून, या प्रकरणाचा संबंध जुगार अड्डे आणि रमी क्लबशी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी पोलिसांनी पुण्यातून रोहन पोकळे याला अटक केली होती. त्यानंतर दुसरा आरोपी आदिराज अनिल सुतार याला बेळगावातून ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मुख्य आरोपीसह इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *