Sunday , September 20 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मकरंद अनासपुरे यांच्याशी राजू पोवार यांची चर्चा

Spread the love

 

बेळगाव शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याबाबत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार पुणे येथे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारविनिमय करण्यात आला. याशिवाय या आंदोलनाचे अनासपुरे यांना आमंत्रण देण्यात आले.
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळणे, ऊस दराचा प्रश्न, शेतीमालाला बाजारपेठ व योग्य भाव, नैसर्गिक संकटांमुळे होणारे नुकसान तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी याबाबत राजू पोवार यांनी अनासपुरे यांच्याशी चर्चा केली. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे यावेळी चर्चेतून अधोरेखित झाले.
भेटी दरम्यान कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फे मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास आपण उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊ, असे आश्वासन अनासपुरे यांनी यावेळी दिल्याचे राजू पोवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *