Sunday , September 20 2026
Breaking News

मुलींच्या वसतिगृहात मद्यपार्टी; व्हिडिओ व्हायरल, चौकशीची मागणी

Spread the love

 

कलबुर्गी : जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील कडगंची येथील बीसीएम (BCM) महिला वसतिगृहात विद्यार्थिनींनी कथितरित्या मद्यपार्टी केल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तसेच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी वसतिगृहाच्या खोलीत बसून मद्यसेवन करत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्हिडिओ विद्यार्थिनींनीच चित्रीत केल्याची चर्चा असून, तो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था, शिस्त आणि देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्याच्या विविध भागांसह इतर राज्यांतूनही अनेक विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, वसतिगृहात मद्य कसे पोहोचले, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, तसेच प्रशासनाच्या देखरेखीत निष्काळजीपणा झाला का, याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. काहींनी वसतिगृह प्रशासन आणि वॉर्डन यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिकृत चौकशी अहवालानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *