Saturday , June 13 2026
Breaking News

निपाणी ‘हालशुगर’ अध्यक्षपदी जयकुमार खोत

Spread the love

 

उपाध्यक्षपदी गीता पाटील; दोन्ही निवडी बिनविरोध

निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयकुमार खोत यांची तर उपाध्यक्षपदी गीता सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा कारखान्याच्यावतीने माजी अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, मल्टीस्टेटनुसार या निवडीला सहकार खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून मान्यता मिळाल्याचा मेल कारखान्यास प्राप्त झाला आहे. ही निवड कारखान्याचे मार्गदर्शक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना ऊस उत्पादक सभासद व कामगारांचे हित साधण्यासाठी सर्व संचालक मंडळ सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी काम पाहिले. संचालक मंडळातर्फे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
नूतन अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले, कारखान्याचे विकासासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मिळून काम करू. कारखाना आणि सभासदांच्या सहकार्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. कारखान्याचे संचालक समित सासणे, श्रीकांत बन्ने, आनंद यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक जयवंत भाटले, माजी उपाध्यक्ष पवनकुमार पाटील, प्रकाश शिंदे, रामगोंडा पाटील, रमेश पाटील, विनायक पाटील, सुहास गुगे, श्रीकांत बन्ने, राजू गुंदेशा, वैशाली निकाडे यांची तसेच नियुक्त संचालक आर एल चौगुले, देवाप्पा देवकाते, भरत नसलापुरे, सुनील पाटील व कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांची उपस्थिती होती. गजानन रामनकट्टी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पाऊस वारा येताच बत्तीगुल

Spread the love  पावसाळापूर्व कामावर प्रश्नचिन्ह; दररोज तीन तासापेक्षा अधिक वेळ वीज गायब निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *