Friday , August 21 2026
Breaking News

दुर्मिळ आध्यात्मिक योगावरील श्रीदत्तयागाची जय्यत तयारी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने अधिक मास, कर्क राशीतील वर्गोत्तम उच्चस्थ गुरू आणि पंचरात्रिपर्व यांच्या दुर्मिळ संयोगावर आयोजित करण्यात आलेल्या श्रीदत्तयाग महोत्सवाची सर्व तयारी करणे चालू असून, परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. रविवार (ता. १४) आणि सोमवार (ता.१५) रोजी संजीवनगिरीच्या पायथ्याशी वल्भालय भवनाच्या प्रांगणात हा भव्य धार्मिक सोहळा साजरा होणार आहे.
सुमारे ८० ते ९५ वर्षांनी एकदाच लाभणाऱ्या या दुर्मिळ आध्यात्मिक योगामुळे यंदाच्या श्रीदत्तयागाला विशेष महत्त्व प्राप्तझाले आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविक, साधक आणि दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्री दत्तयाग रुप महायज्ञासाठीभव्य व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना सोयीस्करपणे यज्ञकर्मात सहभागी होता यावे यासाठी संपूर्ण परिसरात पत्र्याच्या मजबूत छताने सुसज्ज असा विशाल आणि आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात एकाच वेळी मोठ्या संख्येने साधक व भाविक यज्ञविधीत सहभागी होऊ शकतील अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, वाहनतळ, निवास व अन्य आवश्यक सुविधांचीही योग्य नियोजनपूर्वक व्यवस्था करण्यात आली आहे.
यज्ञस्थळाची सजावट, यज्ञकुंडांची उभारणी, पूजासाहित्याची तयारी, भाविकांच्या स्वागतासाठी आवश्यक व्यवस्था आणि सुरक्षा नियोजन अशी सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. देवस्थान समिती, स्वयंसेवक तसेच परिसरातील अनेक गावांतील भाविक गेल्या अनेक
विशेष म्हणजे परिसरातील युवकवर्ग आणि इतरही भक्तांनी या महायज्ञाच्या पूर्वतयारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. मंडप उभारणी, परिसर स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, भाविकांना मार्गदर्शन आणि विविध सेवाकार्यात युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यांच्या या सेवाभावी योगदानामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, सेवा आणि समर्पणाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक मासातील वद्य चतुर्दशी आणि अमावास्या या पुण्यप्रद तिथींच्या औचित्याने होत असलेल्या या श्रीदत्तयागाबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. अनेक भाविकांनी यज्ञासाठी पूर्वनोंदणी केली असून, या दुर्मिळ योगाचा लाभ घेण्यासाठी दूरदूरवरून नोंदणी केलेल्या सर्व भाविकांनी यज्ञस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला ६२ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा

Spread the love  मुदतठेवींचे नूतनीकरण करण्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांचे आवाहन बेळगाव : श्री तुकाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *