Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

निपाणीचा उरुस शांततेत पार पाडा; उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी

  निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा ऊरूस बुधवार (ता.२२) पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त शहर पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ऊरूस उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावे. ऊरूस काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा …

Read More »

गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत रोषणाईचा झगमगाट

  यूएसबी लाइट माळांना मागणी; ५० पेक्षा अधिक प्रकार निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवाला १ दिवस शिल्लक असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. अशोकनगर, चाटे मार्केट, बेळगाव नाका, जुना पीबी रोड परिसरातील इलेक्ट्रिक दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून विविध प्रकारच्या विद्युत …

Read More »

गणेशमूर्ती प्रतिष्ठानपणा मिरवणुकीत महिलांशी गैरवर्तन; हुबळीमध्ये तणाव

    महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध हुबळी : गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी महिलांशी कथितरित्या गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना हुबळी येथे घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हुबळीतील मराठा गल्ली ते सीबीटीकडे जाणाऱ्या मार्गावर मेदार गल्ली आणि कलाल गल्ली …

Read More »

शिरोलीच्या विद्यार्थ्यांची बुद्धीबळ व बॅडमिंटनमध्ये जिल्हास्तरीय निवड

  खानापूर : नुकताच खानापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ व बॅडमिंटन स्पर्धेत शासकीय माध्यमिक विद्यालय, शिरोली, ता. खानापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सानिका कोवाडकर, सानिका गावकर, परशराम गावकर आणि महादेव दळवी यांनी …

Read More »

देश, देव, धर्मासाठी प्रत्येकांनी काम करावे

    अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात देशात अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे. त्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रत्येकाने देश, देव आणि धर्मासाठी काम केल्यास जीवन सुखकर होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधुसंतांच्या सहवासात राहून जीवन पद्धती समजून घ्यावी, असे …

Read More »

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : सणासुदीचे दिवस आले… घरात आनंदाचे वातावरण असायला हवे; मात्र आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांचे लक्ष लागले आहे ते गृहलक्ष्मी योजनेच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याकडे! योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी शासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र …

Read More »

रोजगार हमीच्या कामावरून डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला!

  गोदगेरी क्रॉसजवळ दुचाकी झाडावर आदळली; बाळगुंदच्या मजुराचा जागीच मृत्यू खानापूर : रोजगार हमीच्या कामावर असताना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. डॉक्टरांकडे उपचार घेऊन घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगतच्या झाडावर दुचाकी आदळली. या भीषण अपघातात बाळगुंद येथील मजुराचा जागीच मृत्यू झाला. संजय गणपती सुतार (रा. बाळगुंद) असे मृत्यू झालेल्या …

Read More »

गणपती भाड्याने! बेंगळूरमध्ये उत्सवाची नवी संकल्पना

  भव्य मूर्तीची हौसही भागणार; पर्यावरणपूरक विसर्जनाचाही मार्ग मोकळा बेंगळूर : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमत असताना बेंगळूरमध्ये यंदाचा गणेशोत्सव एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आला आहे. गणेशमूर्ती विकत घेण्याऐवजी ती चक्क भाडेतत्त्वावर घेण्याची नवी संकल्पना येथे आकाराला आली आहे. मोठ्या आकाराची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्याची मंडळांची इच्छा आणि …

Read More »

लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड मणगुती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय, मणगुती येथील विद्यार्थ्यांनी हुक्केरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सरकारी माध्यमिक शाळा, नेरली (ता. हुक्केरी) …

Read More »

पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी शक्य

  लक्ष्मणराव चिंगळे; जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवड झाल्याने सत्कार निपाणी (वार्ता) : पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर यापूर्वी दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. या पुढील काळात पक्ष संघटन व बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे. शिवाय पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे नुतन अध्यक्ष …

Read More »