खानापूर : तालुक्यातील ओलमनी येथील शेतकरी मारुती पवार यांच्या शेतातील गोठ्यातून दोन म्हशी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा खानापूर पोलिसांनी अवघ्या दोन ते तीन दिवसांत छडा लावल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबद्दल खानापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मारुती पवार यांच्या गोठ्यातून रात्रीच्या वेळी दोन म्हशी चोरीला गेल्यानंतर याबाबत तातडीने …
Read More »विज्ञान प्रदर्शनामुळे संशोधन वृत्तीला वाव
डॉ. पूर्णिमा चिरंतीमठ ; बागेवाडी कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन निपाणी (वार्ता) : विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान, संशोधन आवड आणि नवीन संशोधांबद्दलची रुची विकसित करतात. अशी प्रदर्शने केवळ विद्यार्थ्यांची सर्जनशीलताच प्रकट करण्यासह लेखन, संवाद आणि प्रभावी सादरीकरण कौशल्ये देखील वाढवतात, असे मत हुबळी येथील आय.ई.एम.एस. बिझनेस स्कूलच्या संचालिका डॉ. …
Read More »गटबाजीपेक्षा कार्यकर्त्यांची मते जाणून निवडी; पक्षनिरीक्षक विनय नावलगट्टी
मराठा मंडळमध्ये कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी आणि बेडकीहाळ या विभागासाठी नव्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. या दोन्ही निवडी गटबाजी व्यतिरिक्त, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन केल्या जाणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक विनय नावलगट्टी यांनी दिली. येथील मराठा मंडळ मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राजेश कदम …
Read More »बोरगांव उरुसानिमित्त भक्तिमय वातावरणात पारंपरिक गालिफ अर्पण सोहळा
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर बाबा ढंगवाली गुलरवा व हजरत पीर हैदरसा मदरसा पुरुषाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त पाटील घराण्यातर्फे पारंपरिक गालिफ अर्पण कार्यक्रम सवाद्य मिरवणुकीनेपार पडला. यावेळी अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते धार्मिक …
Read More »मासेमारीच्या जाळ्यांची वारंवार चोरी
मासेमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ ; सदलगा-बोरगाव परिसरातील मासेमार त्रस्त निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र-कर्नाक सीमेलगतच्या पंचगंगा नदीत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या बोरगाव, सदलगा परिसरातील गोसावी, बागडी मासेमार कुटुंबांना वारंवार जाळी चोरीच्या प्रकारांचा फटका बसत आहे. जाळ्यांची रात्रीच्या वेळी चोरी होत असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मासेमार नदीत मासे …
Read More »कल्पकता वाढविण्यासाठी वाचन आवश्यक
सुनील पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये दिवाळी अंकाचे वितरण निपाणी (वार्ता) : आधुनिक जीवनशैलीमुळे वाचनासाठी वेळ नाही. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, कल्पकता वाढविण्यासाठी वाचन संस्कृतीचे संवर्धन गरजेचे असल्याचे मत नागपूर येथील ज्ञान संदेश मासिकाचे संपादक सुनील पाटील यांनी केले. कुर्ली येथील एच जे सी चीफ फौंडेशन वा राज्य मराठी …
Read More »माजी आमदार अरविंद पाटील यांच्या आरोग्य शिबिराला जनतेचा उदंड प्रतिसाद!
खानापूर : खानापूर हा निसर्गाचे लेणे लाभलेला, हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आणि कष्टकरी शेतकरी व बहुजन समाजाने समृद्ध असलेला तालुका. परंतु, या दुर्गम आणि जंगलमय भागात आरोग्य सेवांची मोठी कमतरता नेहमीच जाणवत आली आहे. गावात गंभीर आजार उद्भवल्यास किंवा तातडीच्या उपचारांसाठी बेळगावसारख्या मोठ्या शहरांतील रुग्णालयांची पायरी चढावी लागते. मात्र, बेळगावमधील …
Read More »काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीच्या वतीने जांबोटी विभागात जनजागृती
जांबोटी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जांबोटी विभागात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून कर्नाटक राज्योत्सवाचा निषेध करावा, तसेच आपले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन समितीने केले. भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, …
Read More »खानापूर समितीच्यावतीने नंदगड विभाग व परिसरात जनजागृती मोहीम; कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन
नंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नंदगड विभाग व परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून कर्नाटक राज्योत्सवाचा निषेध करावा, तसेच उद्योग-व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन समितीने केले. भाषावार प्रांतरचनेत मराठी …
Read More »क्रीडांगणे गाजवली अन् म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या ‘दहा सुकन्यां’नी राज्यस्तरीय खेळाच्या महासंग्रामध्ये धडक मारली!
खानापूर : जिद्द, चपळाई आणि खेळावरील अफाट प्रेमाच्या जोरावर खानापूरच्या क्रीडाक्षितीजावर म मं ताराराणी पी.यू. कॉलेजच्या सुकन्यांनी ऐतिहासिक रोमहर्षक यश संपादन केले आहे. तालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडांगणांवर आपल्या चपळाईची आणि कौशल्याची जादू दाखवत, महाविद्यालयाच्या तब्बल दहा विद्यार्थिनींची थेट राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली निवड स्वबळावर शिध्द केली आहे हा संपूर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta