Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नातेवाईकाच्या निवासस्थानीही ईडीची झडती

    कर्नाटक-महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाई बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर बुधवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी शोधमोहीम हाती घेतली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकाचवेळी झडती सुरू असून, सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगाव विभागातील अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या …

Read More »

माणिकवाडी क्रॉसजवळील दुचाकी-ट्रक अपघातात जखमी झालेल्या पत्नीचाही मृत्यू

    खानापूर प्रतिनिधी : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी रात्री दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन भारतीय सैनिक युवराज शत्रुघ्न माळिक (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी मोहिनी युवराज माळिक (२५, रा. जटगे) यांचा उपचारासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. …

Read More »

‘108’ रुग्णवाहिका सेवा धोक्यात; 3,500 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

  प्रलंबित वेतनवाढीसह विविध मागण्यांवर सरकारचे दुर्लक्ष; 15 दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा बेळगाव : राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या ‘आरोग्य कवच 108’ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीसह विविध मागण्यांकडे सरकार आणि संबंधित यंत्रणेने …

Read More »

भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारावर न्यायालय संतप्त; KPSC माजी अध्यक्षांना जामीन नामंजूर

  पशुवैद्यकीय अधिकारी भरती घोटाळा; सार्वजनिक परीक्षांवरील विश्वास ढासळत असल्याची न्यायालयाची खंत बेळगाव : पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (KPSC) माजी अध्यक्ष साहुकार एस. शिवशंकरप्पा यांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस. विश्वजित शेट्टी …

Read More »

तोपिनकट्टी मार्गावर भीषण अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

  मुलाचा जागीच मृत्यू; गंभीर जखमी वडिलांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली खानापूर : लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या वडिलांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने लक्केबैल व …

Read More »

NH-4A वर सेवा रस्ते, अंडरपास व स्ट्रीट लाईटची मागणी

  खानापूर : तालुक्यातील हलकर्णी, होनकल, खेमेवाडी आणि हत्तरगुंजी क्रॉस परिसरातून जाणाऱ्या NH-4A (बेळगाव–पणजी) महामार्गावर सेवा रस्ते, वाहनांसाठी अंडरपास (VUP) आणि स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केली आहे. यासंदर्भात खासदार कागेरी यांनी दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) धारवाड प्रकल्प …

Read More »

“गोविंदा रे गोपाला…!” निपाणीत दहीहंडीचा अभूतपूर्व उत्साह!

ढोल ताशाच्या निनादात संकेश्वरच्या पथकाने मिळविला मान निपाणी (वार्ता) : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने निपाणी येथील चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाला. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा …

Read More »

तिरुपतीहून परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी कोलार : तिरुपती येथील तिरुमला मंदिरात दर्शन घेऊन बंगळुरूकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे कोलार जिल्ह्यातील केजीएफ तालुक्यातील दोड्डकारी गावाजवळ चेन्नई-बंगळुरू एक्स्प्रेसवेवर घडला. …

Read More »

शिवठाण हायस्कूलचे लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

  शिवठाण (ता. खानापूर) : येथील श्री रवळनाथ हायस्कूलच्या खेळाडूंनी लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. सांघिक स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ४x१०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम, तर ४x४०० मीटर रिले स्पर्धेत …

Read More »

शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नव्हे, तर राष्ट्रशिल्पकार! – सीमाकवी रवींद्र पाटील

  खानापूर (प्रतिनिधी) : शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा नसून त्यांच्या विचारांना दिशा देणारा, मूल्यांची रुजवण करणारा आणि देशाची भावी पिढी घडविणारा राष्ट्रशिल्पकार आहे, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. खानापूर तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून …

Read More »