दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व भक्तांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून, तसेच बेळगाव …
Read More »हमी योजनेच्या पाठपुराव्याला यश; चोर्ला गावासाठी बससेवा सुरू
खानापूर : तालुक्यातील पंचहमी योजनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर मंगळवारी (ता.१) रोजी चोर्ला गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांसह महिला आणि कामगार वर्गाच्या सोयीसाठी सकाळच्या वेळेत बस सुरू करावी, अशी मागणी गॅरंटी योजनेच्या सदस्य प्रियांका गावकर यांनी योजनेच्या पहिल्या बैठकीपासून सातत्याने केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले. पंच हमी …
Read More »तीन महिन्यांत रेशन कार्ड रद्द करण्यावर ब्रेक!
बीपीएल-एपीएल कार्डधारकांना मोठा दिलासा; निकषांच्या फेरविचारानंतरच पुढील निर्णय : मंत्री रिजवान हर्षद बेळगाव : राज्यातील बीपीएल आणि एपीएल रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत एकही रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यात …
Read More »निर्विघ्न गणेशोत्सवासाठी अडथळे दूर करा
पाणी, स्वच्छता, परवानगीची मानवाधिकार संघटनेची मागणी निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या समस्या तसेच श्री गणेश विसर्जनातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाने संपणार असून, उत्सव …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेच्या हारुगेरीतील कर्ज मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या हारुगेरी येथील कालिकादेवी भवनात आयोजित कर्ज कर्ज मेळाव्याला परिसरातले ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. परमानंद वाडी येथील सद्गुरु डॉ. अभिनव ब्रह्मानंद स्वामी आणि मान्यवर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य शाखेचे अध्यक्ष …
Read More »ऑगस्टमध्ये पावसाचा ‘फ्लॉप शो’; जवाहर तलावाची पाणी पातळी स्थिर
अवघा ६२ टक्के पाऊस निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची निपाणी परिसरात अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात २५० मि. मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महिनाभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा ६२ टक्केच पाऊस …
Read More »हरतालिका, गणेश चतुर्थी एकाच दिवशी : तब्बल २६ वर्षांनंतर योग; पंचांगमधील माहिती
निपाणी (वार्ता) : यंदा हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४ सप्टेंबर) आले आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर असा योग जुळून आल्याची माहिती पौरोहित्यांनी दिली. यापूर्वी १९९६ आणि २००० मध्ये सुद्धा एकाच दिवशी हे दोन्ही सण आले होते. यावेळी हे सण एकाच दिवशी आल्याने आणि तिथीच्या …
Read More »हजारांचा दंड भरण्याऐवजी हेल्मेट घ्या; निपाणी शहरात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर पोलिसातर्फे हेल्मेट सक्ती केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनीथेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी चार दिवसात ४३ दुचाकीस्वारांवर १ हजार हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी २२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल केला. आता यापुढे दंड भरण्याऐवजी या पैशांत हेल्मेट खरेदी …
Read More »बोरगावमधील विकासकामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विविध प्रलंबित विकासकामांना मंजुरी देऊन ती तात्काळ मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले. मंत्री सतीश जारकीहोळी बोरगाव येथे आले असता हावले यांनी त्यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत …
Read More »निपाणीतील आरोग्य शिबिरास शहरासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल व निपाणी येथील माजी जनसेवक जुबेर बागवान, माजी जस्मिन जुबेर बागवान माजी नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरस शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात जनरल चेकअप औषधसह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta