Sunday , September 20 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळा उत्साहात

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील बेळगाव नाक्यावरील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये ‘नेतृत्व क्षमता प्रज्वलित करणारी परिषद’ होती. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देणे व त्यांना प्रेरित करणे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व माजी नगरसेवक दिलीप पठाडे होते.
प्रारंभी रोपाला पाणी घालून मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नेहल पाटील हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेतर्फे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस लीडर्स यांनी पथ संंचलन केले. यावेळी नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना (हेड बॉय, हेड गर्ल, हाउस कॅप्टन आणि इतर मंत्रिमंडळ) बॅच व पदभार लावून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी लोकेश मुगळे व प्रांजळ झीनगे यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप पठाडे, मुख्याध्यापकास स्नेहा घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गौरांग घोटणे व समर्थ आयरेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ऋतुजा देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहाय्याने समाजशास्त्र विभागाच्या शिक्षिका दिपाली पाटील व कलावती मेणसे यांनी परिश्रम घेतले. य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *