Saturday , August 8 2026
Breaking News

बेंगळुरूत देशातील पहिले सरकारी प्रायोजित एआय विद्यापीठ; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा

Spread the love

 

बेळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगळुरूत भारतातील पहिले सरकारी प्रायोजित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना एआय शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे, हे या विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. एआय विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि संशोधनाची दारे खुली केली जाणार आहेत.

कर्नाटकाला ‘एआय-नेटिव्ह राज्य’ म्हणून विकसित करण्यासाठी तसेच प्रशासन आणि सार्वजनिक सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी एआय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करणे, प्रगत संशोधनाला चालना देणे आणि शैक्षणिक संस्था, उद्योग तसेच सरकार यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय, स्टार्टअप्स आणि उद्योगांच्या संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी बेंगळुरूत विशेष एआय हब उभारण्यात येणार असून, ते इन्क्युबेशन सेंटर म्हणूनही कार्य करणार आहे. या उपक्रमामुळे कर्नाटकातील एआय परिसंस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

राजीनामा दिल्यास पाच मिनिटांत मंजूर; मुख्यमंत्री शिवकुमार यांचा नाराज आमदारांना इशारा

Spread the love    बंगळूर : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *