Sunday , July 26 2026
Breaking News

भाजप युवा मोर्चा खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर; किशोर हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांना संधी

Spread the love

 

खानापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष किशोर पांडुरंग हेब्बाळकर यांनी 13 जुलै 2026 रोजी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील विविध भागांतील युवकांना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीत रोशन सुतार (कारलगा) यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून गोपाळ भेकणे, अमित कुंडेकर, सुनील गावडे, नागराज निंबोजी, अद्रूष तुरमुरी, संतोष पाटील आणि सूरज पाटील यांची निवड करण्यात आली.

सरचिटणीसपदी पवन गायकवाड आणि सुनील पेज्जोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून, गणेश पेडणेकर, सुमित कसर्लेकर, स्वप्नील मेलगे, गजानन झुंजवाडकर, विठ्ठल बालप्पनार, सागर देसाई आणि निलेश कुंभार यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सदस्य म्हणून जितेश पाटील, श्रीधर वांद्रे, विश्वनाथ हिराकेन्नावर, सचिन लाटगावकर, गिरीश लंगोटी, महादेव बरगावकर, रवी गावडे, गुंडुराव पाटील, राचय्या होन्नूर, दीपक गवाळकर, संदेश पाटील, रामदास भोसले आणि महादेव कुलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी गुरुप्रसाद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, वेदांत कलम, गजानन एम. हलगेकर आणि नागनाथ बुवाजी हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

यावेळी तालुकाध्यक्ष किशोर पांडुरंग हेब्बाळकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांना भाजपच्या विचारांशी जोडणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह विविध संघटनात्मक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *