Sunday , September 20 2026
Breaking News

युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबाराचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयालगत असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणात एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुरेश जाळगार हे क्लबमध्ये रमी खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे आला. त्यापैकी तिघांनी क्लबमध्ये प्रवेश करून सुरेश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर अन्य दोघे बाहेर थांबले होते.

यावेळी एका संशयिताने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुरेश यांनी प्रतिकार करून तेथून पळ काढल्याने ते बचावले. त्यानंतर संशयितांनी क्लबबाहेर हवेत दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपासणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

पोलिसांनी सुरेश जाळगार यांची चौकशी केली असून, त्यांनी यापूर्वी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

ही घटना कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. गोळीबारामागील नेमके कारण, संबंधितांची ओळख आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *