Monday , September 21 2026
Breaking News

पत्नी -मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत; इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे तीन वर्षीय मुलासह विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पती नागेश तळवार याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रेमा तळवार यांनी तीन वर्षीय मुलगा भुवन याच्यासह आत्महत्या केल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पती नागेश तळवार, सासू सुशीला तळवार, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नागेश तळवार याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या सासू सुशीला तळवार यांच्यासह उर्वरित आरोपी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करून शोधमोहीम सुरू ठेवली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *