Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. कीर्ती अभय बिर्जे राजीव गांधी युनिव्हर्सिटीत द्वितीय

Spread the love

 

बेळगाव : राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेस बेंगलोर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडी परीक्षेचा पदवीदान सोहळा 15 जून रोजी संपन्न झाला. यात शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या डॉ. कीर्ती अभय बिर्जे यांचा राजीव गांधी युनिव्हर्सिटीमध्ये द्वितीय क्रमांक तर शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरमध्ये एमडी अंतिम वर्षात प्रथम क्रमांक मिळविला आहे. होमिओपॅथी रेपर्टरी या विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री संपादन केली असून त्यांना मार्गदर्शक डॉ. संगीता बेळगावीमठ, विभाग प्रमुख डॉ. ललिता नाडगीर, कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. एस. एस. पुजार, डॉ. सुनील मुगेरी, डॉ. प्रेमलता रोट्टी आदी प्राध्यापक, प्राचार्य डॉ. किरण पाटील यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सबीना यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यांचे शालेय शिक्षण मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेतून झाले आहे.

होमिओपॅथी फिलॉसॉफीमध्ये डाॅ. नूति अग्रवाल युनिव्हर्सिटीत सहाव्या, डॉ. जेनिस्का दा सिल्वा या बालचिकित्सक विषयात युनिव्हर्सिटी सहाव्या, डॉ. मूहिलन हे प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन या विषयात युनिव्हर्सिटीत चौथा तर डॉ. सुनील गोमाडी रेपर्टरी विषयात युनिव्हर्सिटीत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *