Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील चिमगावकर गल्ली परिसरात पिसाळलेल्या श्वानाचा दहा जणांना चावा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कुत्र्याने अनेकांचा चावा घेत परिसरात दहशत निर्माण केली आहे.
या घटनेत सुनील गुरव, नजमा बागवान, सुलोचना कमते, हजरत बागवान, मिनाज अब्दुस्सलाम बागवान यांच्यासह अनेक वृध्द महिला जखमी झाल्या आहेत. चिमगांवकर गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामध्ये पाच ते सात जण जखमी झाले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा अनेक भागात केलेल्या हल्ल्यात आणखीन पाच ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. पिसाळलेल्या कुत्र्याने दिवसभर परिसरात दहशत माजविली होती. पालिकेने तत्काळ भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *