Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

निट्टूर मराठी शाळेत स्वयंपाक खोली व वर्गखोल्यांविना विद्यार्थ्यांचे हाल, एसडीएमसीची तालुका पंचायतीकडे धाव

  EO कडून सकारात्मक आश्वासन निट्टूर : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, निट्टूर येथे गेल्या २ ते ३ वर्षांपासून स्वयंपाक खोली (किचन शेड) व सुरक्षित वर्गखोल्या नाहीत. याबाबत ग्रामपंचायत निट्टूर यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर तालुका पंचायत खानापूरचे कार्यनिर्वाहक अधिकारी (EO) श्री. रमेश …

Read More »

गृहज्योती लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुनर्पडताळणीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली

    बेळगाव (वार्ता) : ‘गृहज्योती’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या पुनर्पडताळणीसाठी राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत सोमवारी संपली होती. मात्र, पुनर्पडताळणीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला. राज्यातील विविध वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात अद्याप सुमारे ३० टक्के पुनर्पडताळणीचे काम बाकी असल्याने …

Read More »

अण्णाभाऊ साठेंचे लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  कर्नाटक-महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : मातंग समाजासह तळागाळातील‌ बहुजन समाजातील गरीब, वंचित जनतेसाठी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्वतः कमी शिक्षित असूनही लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना समाजाने मानसिक गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजातील लहान-सहान कामांमध्येच आयुष्य न घालवता …

Read More »

निपाणी शहरातील खड्डे, गटारींच्या समस्येने नागरिक-वाहनधारक संतप्त

  पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला अवघे २० दिवस; नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उरुसाला अवघे २० दिवस शिल्लक असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, …

Read More »

तिसऱ्या सोमवारी शिव मंदिरात हर, हर महादेवाचा गजर

  शिवालयात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्या निमित्त गेल्या दोनही सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील शिवालये भाविकांनी फुलून गेली होती. तिसऱ्या सोमवारीही (ता.३१) दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘बम बम बोले’ चा गजर सुरू होता. येथील महादेव गल्लीतील प्राचीन महादेव मंदिरात पहाटे भाविकांच्या हस्ते …

Read More »

लोंढा बस डेपोत बस नियंत्रकाची नियुक्ती : पंचहमी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णींच्या प्रयत्नांना यश

  गुंजी : लोंढा बस स्थानकात परिवहन खात्याच्या सर्व बसेस येत नसल्याची तक्रार अनेक दिवसापासून होती. मोजक्याच बसेस बस स्थानकात येऊन जात होत्या अनेक बसेस लोंढा क्रॉस वरूनच जात असल्याने लोंढा बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत होता. लोंढा हे रेल्वे जंक्शन स्टेशन असून बाजारपेठेचे …

Read More »

ऊस पिकावर पांढऱ्या किडींच्या प्रादूर्भावाने निपाणी भागातील शेतकरी हतबल

    निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील साखर कारखान्यांच्या उच्च क्षमतेमुळे वाढलेल्या ऊसाच्या पिकावर आता पांढऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस पिकाची वाढ खुंटत असून पानेही पिवळी पडत आहेत. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात असलेल्या साखर कारखान्यांच्या व कृषी …

Read More »

श्रींच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात

  रंगकाम सुरू ;विविध मंडळांकडून नोंदणी सुरू निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील गणेश मूर्तिकारांच्या कुशल हातांनी श्रींच्या मूर्तीवर अंतिम हात फिरविणे सुरू असून, पांरपारिकतेला आधुनिक कलाकुसरीची जोड देत विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपांच्या मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतीच्या मूर्तीचे बुकिंग सुरू …

Read More »

मरणहोळ येथे बिबट्याचा म्हशीच्या रेडकावर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  दड्डी : मरणहोळ, ता. बेळगाव येथे शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगलालगत शेतात चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीच्या दीड ते दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मरणहोळ परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मारुती पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जंगलालगत …

Read More »

केसरेकर दाम्पत्याच्या मारेकऱ्यास फाशी द्या; निवृत्त मराठी शिक्षक संघाच्या बैठकीत मागणी

    कुटुंबाचे पालकत्व सरकारने घ्यावे, ठराव मंजूर खानापूर : खानापूर तालुका निवृत्त मराठी शिक्षक संघाची मासिक बैठक शुक्रवारी संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात अध्यक्ष डी. एम. भोसले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सांगली-कुपवाड येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा …

Read More »