मराठी भाषिकातून संताप: ऐन सणासुदीच्या काळात व्यवसायिकांची तारांबळ निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटक शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न सुरूच आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. पण अशा परिस्थितीत येथील नगरपालिका प्रशासनाने व्यवसायिकांना कन्नड भाषेतील …
Read More »ममदापूर (के.एल.) अंबिका मंदिर यात्री निवासाचे रविवारी उद्घाटन
नवरात्रोत्सवानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : प्रति तुळजाभवानी मानण्यात येणाऱ्या ममदापूर (के. एल.) येथील अंबिका मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. नवरात्र निमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. याशिवाय आमदार शशिकला जोल्ले यांनी धर्मादाय खात्यामधून बांधलेल्या यात्री निवासाचे उद्घाटन रविवारी …
Read More »पालकमंत्र्यांना भेटून यमगर्णी गायरान प्रश्न मिटविणार
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दिले आश्वासन निपाणी (वार्ता) : यमगर्णी येथील गायरान जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या ‘गायरान बचाव’ उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावकऱ्यांच्या …
Read More »खानापूर-बेळगाव महामार्गावर भीषण अपघात; पेपरच्या ट्रकचे दोन तुकडे, चालक सुदैवाने बचावला!
कुपटगिरी रस्त्यावरील पुलावर पहाटे दुर्घटना; ४०० ते ५०० मीटरपर्यंत पेपरचे बंडल विखुरले खानापूर : खानापूर-बेळगाव नवीन महामार्गावरील जुन्या कुपटगिरी रस्त्याच्या पुलावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पेपरचे बंडल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचा पुढील इंजिनचा भाग आणि मागील मालवाहू भाग वेगळे झाले. …
Read More »संकेश्वरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; कारचालकाचा जागीच मृत्यू
संकेश्वर : तिरुपती येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारने मालवाहू ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोटूर (ता. हुक्केरी) गावाच्या हद्दीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंकज गोकुळ बाविस्कर (वय ३५, रा. …
Read More »ऐन नवरात्रोत्सवात दिवसासह रात्री बत्ती गुल्ल; पाणीपुरवठ्यासह धार्मिक कार्यक्रमात विघ्न
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणासह घरोघरी पूजाअर्चा करण्यात येत आहे. पण दिवसा आणि रात्री विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १५ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक
जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांची रणनीती आणि १ नोव्हेंबरच्या काळादिन आंदोलनावर होणार चर्चा खानापूर : आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसह १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिन आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. खानापूर येथील …
Read More »सक्षम उमेदवार निवडणार; खानापूर काँग्रेसची निवडणूकपूर्व तयारी बैठकीत निर्णय
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन; उमेदवार निवडीसाठी छाननी समिती स्थापन करणार खानापूर : जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसतर्फे मंगळवारी रायगड निवास येथे निवडणूकपूर्व तयारी बैठक उत्साहात पार पडली. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच …
Read More »मेंढपाळाच्या मुलीला ‘बीडीएस’साठी शासकीय कोट्यातून प्रवेश बेनाडीच्या साक्षी सौंदलगे हिचे लख्ख यश
निपाणी (वार्ता) : मेंढपाळ समाजातील बेनाडीतील कन्या साक्षी काकासाहेब सौंदलगे हिला बंगळुरू येथील ऑक्सफर्ड डेंटल(दंतवैद्यकीय) महा विद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. तिच्या या लख्ख यशामुळे गावासह मेढपाळ समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बेनाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बेनाडीतील काकासो हल्लाप्पा सौंदलगे यांची कन्या …
Read More »सुधा यादव कर्नाटकच्या नव्या राज्यपाल; थावरचंद गेहलोत यांची जागा घेणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सहा राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी खासदार सुधा यादव यांची कर्नाटकच्या नव्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) सहा राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या आणि फेरबदलांची घोषणा केली. सुधा यादव या विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta