Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सोमवारी सर्वपक्षीय बैठक; आमदार हलगेकरांचा पुढाकार

    खानापूर : खानापूर तालुक्यासह शहरातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांना गती देण्यासाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या बैठकीचे आयोजन खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. …

Read More »

चापगावसह चार गावांसाठी नवीन बससेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी व नोकरदारांना दिलासा

    खानापूर : चापगावसह यडोगा, कारलगा आणि लालवाडी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची बससेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि गॅरंटी योजना समितीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे खानापूर बस आगारातून खानापूर–चापगाव मार्गावर दैनंदिन नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा …

Read More »

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रक्षाबंधन सण साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न आणि उपाध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री. सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रथमेश पूजन झाले सुजाता जाधव, …

Read More »

दोन कारची समोरासमोर धडक; चौघांचा जागीच मृत्यू

  तुमकूर : जिल्ह्यातील चिक्कनायकनहळ्ळी तालुक्यातील गोडेकेरे गेटजवळ दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुवेकेरेकडून भरधाव वेगाने येणारी किया कार आणि चिक्कनायकनहळ्ळीकडून येणारी फोक्सवॅगन कार यांच्यात गोडेकेरे गेटजवळ जोरदार …

Read More »

मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा; भाजपच्या आंदोलनाला यश

  बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप होत असलेल्या मंत्री बी. नागेंद्र यांनी अखेर शुक्रवारी सायंकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने विधिमंडळाच्या सभागृहात तसेच राज्यभर आंदोलन छेडले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिल्लीहून बंगळूरला परतल्यानंतर …

Read More »

अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सण

  निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात इंग्लिश मिडीयम शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव आणि संस्कार कुठेतरी मागे पडू नयेत, याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कृतीची ओळख करून देत पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हातातल्या …

Read More »

देशसेवेत रमलेल्या वीर मनगटावर म. मं. ताराराणीच्या लेकींची उमटली रेशीम धाग्यांची साक्ष

  म. मं. ताराराणी महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळा अनोख्या देशभक्तीने साजरा खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात देशाचे रक्षण करणाऱ्या वीर आजी -माजी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अत्यंत भावूक, देशभक्तीपर आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बहुसंख्येने खानापूर परिसरातील सैनिक उपस्थित होते. हा …

Read More »

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

  परीक्षा, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांसह शिक्षणातील सुधारणांबाबत महिनाभरात अहवाल बंगळूर : विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच शिक्षण क्षेत्रातील आवश्यक सुधारणांचा व्यापक अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि …

Read More »

नूतन मराठी विद्यालयातर्फे झाडांना राखी बांधून अनोखा उपक्रम राबविला

  निपाणी (वार्ता) : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालया तर्फे विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून “वृक्षराखी बंधन करून निसर्गाशी अतूट नाते हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील विविध वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

    निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल कुडची यांच्या संयुक्त विद्यमाने हदनाळ (ता. निपाणी) येथील चव्हाटा मंदिरामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी रयत संघटनेचे …

Read More »