Monday , September 21 2026
Breaking News

बेंगळूरूमध्ये तिहेरी हत्याकांड: आई, आजी आणि मामाची हत्या करून तरुणाची आत्महत्या

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये धक्कादायक तिहेरी हत्येची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने स्वतःच्या आई, आजी आणि मामाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली.

ही घटना बेंगळुरूतील कोट्टिगेपाळ्या येथील अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ घडली. मृतांमध्ये मंगळम्मा (आई), नंजम्मा (आजी) आणि सतीश (मामा) यांचा समावेश आहे. आरोपी प्रशांत याने तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केली.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच कामाक्षीपाळ्या पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *